नवी दिल्ली -

करोना संकटामुळे केंद्र सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने एप्रिल महिन्यात स्थगित केला होता. आता महागाई भत्त्यातील वाढ

आगामी वर्ष 2021 मध्ये पुन्हा सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

माहितीनुसार, मागील जानेवारीत चार टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. यानंतर मार्चमध्ये मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली. मात्र, करोनासंबंधी संकट अधिकच वाढल्यामुळे एप्रिलमध्ये महागाई भत्तावाढ 1 जुलै 2021 पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या संबंधित कर्मचार्यांना 17 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो. सातव्या वेतन आयोगानुसार, जुलै 2021 पासून तो 21 टक्के होणे अपेक्षित आहे. सध्याच्या स्थगितीचा कार्यकाळ संपल्यानंतर भत्त्यात नियमित पद्धतीने वाढ केली जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे. वाढत्या महागाईनुसार सरकार कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनवेळा वाढ करत असते. दरम्यान, आता हा निर्णय झाल्यास 50 लाख केंद्रीय कर्मचार्यांसह 60 लाख निवृत्तिवेतनधारकांना लाभ मिळू शकतो.