केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात होणार साजरी, कारण...

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात होणार साजरी, कारण...

दिल्ली | Delhi

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांची दिवाळी यंदा दणक्यात साजरी होणार आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्यावर निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळी भेट दिली आहे. महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर डीआरमधील वाढीलाही ग्रीन सिग्नल दिला आहे.

महागाई भत्त्यात झालेल्या वाढीमुळे केंद्र सरकारच्या ४७ लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. केंद्र सरकारच्या ४७ लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी ३१ टक्के महागाई भत्ता दिला जाईल. निर्णयाची अंमलबजावणी ऑक्टोबर महिन्याच्या पगारापासून होईल.

पूर्वलक्ष्यी प्रभावाने आधीच्या महिन्यांसाठी जो अतिरिक्त महागाई भत्ता लागू आहे त्याची रक्कम थेट पगारात जमा केली जाईल. यामुळे ऑक्टोबर महिन्याचा पगार मिळेल त्यावेळी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होईल. दिवाळीच्या तोंडावर खर्चासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध होईल. यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी होईल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com