
दिल्ली | Delhi
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. थायलंडने याला 'सितरंग' असे नाव दिले आहे. सितरंग चक्रीवादळ बांगलादेशात रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकले.
चक्रीवादळ सितरंग हे २४ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता ढाकापासून ४० किमी पूर्वेला कोस्टल बांगलादेशच्या दिशेने केंद्रित झाले आहे. ते उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची आणि पुढील ६ तासांमध्ये कमी दाबाच्या क्षेत्रात आणि त्यानंतरच्या ६ तासांमध्ये कमी दाबाच्या क्षेत्रात कमकुवत होण्याची दाट शक्यता आहे.
भारतात पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या ५ राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. सितरंग चक्रीवादळामुळे अलर्ट असलेल्या भारतातील ५ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारतात प्रशासनाने समुद्र किनाऱ्याजवळ सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. मासेमारी करण्यासाठी अथवा पर्यटनासाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे.