
दिल्ली | Delhi
बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचे क्षेत्र रविवारी संध्याकाळी चक्रीवादळात रूपांतरित होऊन बांगलादेश किनारपट्टीकडे सरकले. थायलंडने या चक्रीवादळाला 'सितरंग' असे नाव दिले आहे.
सितरंग चक्रीवादळाचा परिणाम आता भारतात दिसून येत असून आसाममधील (Assam) परिस्थिती चिंताजनक आहे. येथे सुमारे ८३ गावांतील ११०० हून अधिक लोकांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, वादळामुळे आतापर्यंत ११४६ लोक प्रभावित झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने माहिती दिली आहे.