Cyclone Shaheen : 'गुलाब'नंतर आता 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका

महाराष्ट्र आणि गुजरात किनाऱ्यांना IMD चे अलर्ट
Cyclone Shaheen : 'गुलाब'नंतर आता 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका
File Photo

मुंबई | Mumbai

सध्या गुलाब चक्रीवादळानं (Cyclone Gulab) सगळीकडे थैमान घातलं आहे. पुर्व किनारपट्टीवरनंतर (East coast) आता हे वादळ हळूहळू पश्चिम किनारपट्टीकडे (West coast) सरकत आहे. त्यामुळे अनेक भागांत अतिमुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा दिला जात आहे.

अशातच आता गुलाब चक्रीवादळाचा (Gulab Cyclone) एक भाग बाजूला होऊन तयार झालेल्या शाहीन चक्रीवादळाचा (Cyclone Shaheen) धोका निर्माण झाला आहे. हे वादळ अरबी समुद्रात (Arabian Sea) येणार असल्याने पश्चिम किनारपट्टीवर (West coast) याचा परिणाम होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरात (Gujarat) या दोन राज्यांना या चक्रीवादाळाचा (Cyclone) धोका असून समुद्रकिनारी भागात (Beach area) राहणाऱ्या लोकांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. तसंच शाहीन वादळामुळे (Cyclone Shaheen) कोकणाला (Kokan) मुसळधार पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आला आहे.

शाहीनच्या (Cyclone Shaheen) प्रभावाने कोकण (Kokan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) अतिवृष्टीची (Heavy rain alert) शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. गुजरातच्या किनारपट्टीवरील (Coast of Gujarat) २० जिह्यांना 'यलो ऍलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवार पर्यंत वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याची माहिती IMD च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर वादळ भारतीय किनाऱ्यापासून दूर जात पाकिस्तान-मॅक्रान किनारपट्टीच्या जवळ पश्चिम-वायव्य दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे.

तसेच, २ ऑक्टोबरपर्यंत उत्तर आणि लगतच्या मध्य अरबी समुद्र, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच मच्छिमारांनी देखील मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com