Cyclone Mocha : वर्षातील पहिलं चक्रीवादळ 'मोचा' येत्या ४८ तासांत धडकणार... जाणून घ्या, कोणत्या राज्यांना बसणार फटका?

Cyclone Mocha : वर्षातील पहिलं चक्रीवादळ 'मोचा' येत्या ४८ तासांत धडकणार... जाणून घ्या, कोणत्या राज्यांना बसणार फटका?

दिल्ली | Delhi

भारतीय हवामान विभागाने (IMD)समुद्र किनारपट्टीच्या भागात राहाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या ६ मे रोजी दक्षिण- पूर्व बंगालच्या उपसागराला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

देशावर मोचा चक्रीवादळाचं (Cyclone Mocha) नवे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे २०२३ या वर्षातील पहिलं चक्रीवादळ ठरणार आहे.

Cyclone Mocha : वर्षातील पहिलं चक्रीवादळ 'मोचा' येत्या ४८ तासांत धडकणार... जाणून घ्या, कोणत्या राज्यांना बसणार फटका?
Weather Alert : पुन्हा गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा, 'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट

या वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पाच दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याने पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

याशिवाय, उत्तर प्रदेशात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी गारपीटही होऊ शकते. पंजाब, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, तेलंगणा, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.

Cyclone Mocha : वर्षातील पहिलं चक्रीवादळ 'मोचा' येत्या ४८ तासांत धडकणार... जाणून घ्या, कोणत्या राज्यांना बसणार फटका?
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेची वाहनामध्ये प्रसूती

वादळाला कसं मिळालं 'मोचा' हे नाव?

या वादळाचं नाव Cyclone Mocha असं निर्धारित करण्यात आलं आहे. यमननं तांबड्या समुद्रकिनारी असणाऱ्या मोचा या बंदराच्या नावावरून या चक्रीवादळाचं नाव सुचवल्याची माहिती समोर येत आहे.

चक्रीवादळांना कशी नावे ठेवली जातात ?

जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे. त्यानुसार विविध देश त्यांच्यातर्फे नावं सूचवतात. वादळांची नावं देशांकडून आणि सुचवलेल्या नावांमधूनच सुचवली जातात. 1953 पासून नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ) चक्रीवादळं आणि उष्णकटीबंधीय चक्रीवादळांची नावं ठेवत आला आहे.

डब्ल्यूएमओ ही जिनिवास्थित संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. डब्ल्यूएमओच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनेल रद्द करण्यात आलं आणि संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं ठेवायला सांगितलं. यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी 64 नावांची एक यादी सोपवली. त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी 8 नावं सूचवण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com