
श्रीनगर | Srinagar -
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा आणि स्वायत्तता देणारेे कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयाला उद्या 5 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या निर्णयाविरोधात आजही काश्मीरमध्ये असंतोष असून उद्या काश्मीरमध्ये ब्लॅक डे म्हणजेच काळा दिन पाळण्याची घोषणा काही फुटीरतावादी संघटनांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर काही फुटीरतावादी आणि पाकिस्तानधार्जिणे दहशतवादी गट हिंसाचार घडविण्याची शक्यता लक्षात घेऊन, संपूर्ण जम्मू-काश्मिरात 4 व 5 ऑगस्टला संचारबंदी जारी करण्यात आली आहे. श्रीनगरचे जिल्हाधिकारी शाहीद इक्बाल चौधरी यांनी या संचारबंदीचा आदेश तात्काळ प्रभावाने लागू केला आहे. Curfew in Jammu Kashmir
पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे मोठ्या प्रमाणात जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. आज मंगळवारपासून दोन दिवस काश्मीर खोर्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून, तिचे कठोरपणे पालन केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस आणि जवान आपल्या वाहनांमधील ध्वनीक्षेपकांद्वारे रस्त्यांवर फिरून नागरिकांना देत आहेत. first anniversary of the revocation of Article 370 in Jammu and Kashmir on August 5
नागरिकांनी घरातच राहावे आणि नियमांचे उल्लंघन करू नये. पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एका ठिकाणी जमा होऊ नये, असे आवाहनही केले जात आहे. तसेच करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जमाव जमविण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.