
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
मंदिराच्या शिखराला धडकून प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला असून इंटर्न जखमी झाला आहे...
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा जिल्ह्यात चोरहाटा पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी गावात हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशिक्षणार्थी विमान एका मंदिराच्या शिखरावर आदळल्याने हा अपघात (Accident) झाला.
यामुळे विमानाला आग लागली. अपघातात वरिष्ठ पायलटचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.