COVID19 : भारतातील Omicron बाधितांची संख्या २०० वर; करोना स्थिती काय?

COVID19 : भारतातील Omicron बाधितांची संख्या २०० वर; करोना स्थिती काय?
Corona

दिल्ली | Delhi

करोनाच्या (Covid-19) नव्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटने जगभरात हाहा:कार माजवला आहे. डेल्टापेक्षा ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग जास्त असला तरी तितका धोकादायक नसल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासातून तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.

भारतातही ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आता देशातील एकूण रुग्णांची संख्या ही २०० वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात ओमिक्रॉन सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र आणि दिल्लीत आढळून आले आहेत.

Corona
करोनाचा नवा व्हेरियंट 'ओमिक्रॉन'ची लक्षणे काय?, कशी घ्याल काळजी?

महाराष्ट्रातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही ५४ वर गेली आहे. यातील २८ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिल्लीतही एकूण रुग्णांची संख्या ही ५४ पर्यंत पोहोचली आहे. यातील १२ रुग्ण बरे झाले आहेत.

तेलंगणमध्ये २० रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात १९ रुग्ण आढळले. त्यापैकी १५ जण बरे झाले आहेत. राजस्थानमध्ये १८ रुग्ण आढळले आणि सर्वजण बरे झाले आहेत. केरळमध्ये १५, गुजरातमध्ये १४, उत्तर प्रदेशात २ रुग्ण आढळले आणि ते दोन्ही बरे झाले आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येक एक रुग्ण आढळून आला आहे.

Corona
ओमिक्रॉन व्हेरिएंटवर Covishield प्रभावी आहे का? अदर पूनावाला म्हणाले....

देशात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तसात देशभरात ५ हजार ३२६ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४५३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४७ लाख ५२ हजार लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तब्बल ४ लाख ७८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

Corona
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख ७० हजार लोक बरे झाले आहेत. देशात सध्या करोना सक्रिय रुग्णांची संख्या ही १ लाखांपेक्षा कमी आहे. सध्या ७९ हजार ९७ लोक हे करोनाग्रस्त असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Corona
Happy Birthday Tamannaah : 'मिल्क ब्युटी' तमन्नाचा आज वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल...
Corona
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com