COVID19 : देशातील सक्रिय रूग्णसंख्या २०३ दिवसांमधील निच्चांकी स्थानावर, वाचा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)
COVID19 : देशातील सक्रिय रूग्णसंख्या २०३ दिवसांमधील निच्चांकी स्थानावर, वाचा आजची आकडेवारी

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे देशातील सक्रिय रुग्णसंख्या घटली असून २०३ दिवसांमधील निच्चांकी स्थानावर आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात करोनाचे (New corona patient today) १८ हजार ८३३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, सद्यस्थितीत देशात २ लाख ४६ हजार ६८७ सक्रिय करोना रुग्ण आहेत. हा गेल्या २०३ दिवसांतील सर्वात लहान आकडा आहे. मंगळवारी (५ ऑक्टोबर) देशात १८ हजार ३४६ नवीन करोना प्रकरणांची नोंद झाली आहे. ही गेल्या २०९ दिवसांतील ही सर्वात कमी नोंद होती. तुलनेने आज हा आकडा वाढलेला दिसतो.

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)

राज्यात करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज २,०२६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५ हजार ३८९ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ८६ हजार ०५९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com