COVID19 : देशात सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख २२ हजारांपार, आज किती रुग्णांची नोंद?

COVID19 : देशात सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख २२ हजारांपार, आज किती रुग्णांची नोंद?

दिल्ली | Delhi

करोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेतून सावरत व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच देशात करोना संसर्ग पुन्हा चिंता वाढवत आहे. आज देशात १८ हजाराहून अधिक नोंद झाली आहे. (corona new cases)

गेल्या २४ तासात १८ हजार ८१५ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १ लाख २२ हजार ३३५ वर पोहोचली आहे. तर ३८ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

दरम्यान काल दिवसभरात १५ हजार ८९९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यासह आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी २९ लाख ३७ हजार ८७६ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे मृतांची संख्या ५ लाख २५ हजार ३४३ वर पोहोचली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com