COVID19 Update India : भारतात गेल्या २४ तासांत ४३ हजार नवे रुग्ण

९११ रूग्णांचा मृत्यू
COVID19 Update India : भारतात गेल्या २४ तासांत ४३ हजार नवे रुग्ण

दिल्ली | Delhi

देशात गेल्या तीन ते चार महिन्यापासून करोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Second Wave) अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र दररोज समोर येणारी करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. तर, रूग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४३ हजार ३९३ नवे करोना रुग्ण (New Covid19 Patient) आढळले असून ९११ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ३ कोटी ०७ लाख ५२ हजार ९५० इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू (Covid19 death) झालेल्यांची संख्या ४ लाख ०५ हजार ९३९ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ४४ हजार ४५९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ९८ लाख ८८ हजार २८४ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ४ लाख ५८ हजार ७२७ रुग्णांवर उपचार आहेत.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान तापर्यंत ३६ कोटी ४८ लाख ४७ हजार ५४९ लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यातील २९ कोटी ५८ लाख ८९ हजार ८७० लोकांना पहिला डोस मिळाला आहे, तर ६ कोटी ८९ लाख ५७ हजार ४७९ लोकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. गेल्या २४ तासांत ३३ लाख ८ हजार लोकांना लस देण्यात आली. (corona vaccination update)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com