COVID19 : महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले..

COVID19 : महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले..

दिल्ली | Delhi

करोना (Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. आज त्यांनी सहा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंद्वारे (Video conferencing) संवाद साधला.

यात महाराष्ट्र (Maharashtra), तमिळनाडू (Tamilnadu), केरळ (Keral), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), कर्नाटक (Karnatak), ओडिसा (Odisa) या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah), आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Health Minister Mansukh Mandvi) आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Union Minister of State for Health Bharti Pawar) हे देखील उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान म्हणाले, आधी तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की, ज्या राज्यांमधून करोनाच्या दुसऱ्या लाटेची (Corona second wave) सुरुवात झाली आहे, तिथली परिस्थिती आधी नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळमध्ये (Keral) करोना रुग्णांची (COVIID1 patient) संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे. देशातले ८० टक्के करोनाबाधित हे याच सहा राज्यांमधले आहेत. तसंच ८४ टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. ही चिंताजनक बाब असल्याचंही ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com