COVID19 : भारतात सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांवर रुग्णांची नोंद तर तर १.९३ लाख करोनामुक्त

COVID19 : भारतात सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांवर रुग्णांची नोंद तर तर १.९३ लाख करोनामुक्त

दिल्ली l Delhi

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाची चिंता वाढवली आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारतात दररोज तीन लाखांहून अधिक करोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे.

रोजच्या करोनाबाधितांच्या वाढीबाबत आता भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. करोनाबाधितांची ही संख्या जगातील करोनाबाधितांच्या संख्येच्या वाढीचा एक विक्रम आहे. एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत असताना मृतांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल ३ लाख ३२ हजार ७३० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ६२ लाख ३६३ हजार ६९५ इतकी झाली आहे.

Title Name
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना करोना लस; कधी व कुठे कराल नोंदणी?
COVID19 : भारतात सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांवर रुग्णांची नोंद तर तर १.९३ लाख करोनामुक्त

तसेच गेल्या २४ तासात १ लाख ९३ हजार २७९ जण उपचारानंतर बरे झाले असून २ हजार २६३ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी ३६ लाख ४८ हजार १५९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात सक्रिय रुग्नांची संख्या २४ लाख २८ हजार ६१६ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ८६ हजार ९२० इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १३ कोटी ५४ लाख ७८ हजार ४२० जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

दरम्यान, महाराष्ट्रात करोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून गुरुवारी दिवसभरात ५६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचा दर १.५३ टक्के इतका आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात ६७ हजार १३ नवीन रुग्णांची नोंद झाली. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४० लाख ९४ हजार ८४० झाली आहे.

गुरुवारी नोंद झालेल्या ५६८ मृत्यूंपैकी ३०९ मृत्यू हे मागील ४८ तासात तर १५८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १०१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के एवढा आहे. आजअखेरपर्यंत राज्यात एकूण ६ लाख ९९ हजार ८५८ सक्रिय रुग्ण आहेत.

Title Name
'या' देशाकडून करोनामुक्त झाल्याची घोषणा!; मास्क बंधनकारक नाही
COVID19 : भारतात सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांवर रुग्णांची नोंद तर तर १.९३ लाख करोनामुक्त

तसेच गुरुवारी ६२ हजार २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ३३ लाख ३० हजार ७४७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३४ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४८ लाख ९५ हजार ९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४० लाख ९४ हजार ८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ७१ हजार ९१७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९ हजार १४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com