COVID19 : भारतात सलग चौथ्या दिवशी करोनाबाधितांची संख्या एक लाखांहून कमी

महाराष्ट्रातील स्थिती काय?
COVID19 : भारतात सलग चौथ्या दिवशी करोनाबाधितांची संख्या एक लाखांहून कमी

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे दिलासादायक वातावरण असले तरिही मृत्यूच्या आकडेवारीनं मात्र चिंता वाढवली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ९१ हजार ७०२ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ४०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३ इतकी झाली आहे.

COVID19 : भारतात सलग चौथ्या दिवशी करोनाबाधितांची संख्या एक लाखांहून कमी
शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर 'सिल्व्हर ओक'वर; कोणती रणनीती ठरणार?

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ६३ हजार ०७९ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात १ लाख ३४ हजार ५८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ७७ लाख ९० हजार ०७३ वर पोहचली आहे.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण २४ कोटी ६० लाख ८५ हजार ६४९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ३२ लाख ७४ हजार ६७२ लसीचे डोस गुरुवारी देण्यात आले.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळाल होतं. पण रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याचे दिसून आले. राज्यात काल उपचारानंतर बरे झालेल्या ११ हजार ४४९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १२ हजार २०७ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात ३९३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ८ हजार ७५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.४५ टक्के इतके झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७७ टक्के इतका आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com