COVID19 : काळजी घ्या! भारतात वेगाने रुग्णवाढ; आज तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद

Omicron रुग्णांची संख्या १२०० च्या पार
COVID19 : काळजी घ्या! भारतात वेगाने रुग्णवाढ; आज तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद

दिल्ली | Delhi

जगभरात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) चिंता वाढवली असतानाच आता भारतातही दैनंदिन करोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ (Coronavirus cases in India) होताना दिसत आहे.

COVID19 : काळजी घ्या! भारतात वेगाने रुग्णवाढ; आज तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

देशात गेल्या २४ तासांमध्ये १६ हजार ७६४ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, २२० बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४८ लाख ३८ हजार लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ लाख ८१ हजार ०८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ९१ हजार ३६१ वर पोहोचली आहे.

COVID19 : काळजी घ्या! भारतात वेगाने रुग्णवाढ; आज तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

Omicron चाही कहर

तसेच भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा कहर पाहण्यास मिळतो आहे. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron) रुग्णांची संख्या १ हजार २७० वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात ओमिक्रॉनचे १९८ नवे रूग्ण आढळले आहेत. या १९८ रूग्णांमध्ये ३० आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत.

COVID19 : काळजी घ्या! भारतात वेगाने रुग्णवाढ; आज तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

महाराष्ट्रातील ओमिक्रॉनचे कुठे, किती रुग्ण?

मुंबई - ३२७

पिंपरी चिंचवड - २६

पुणे ग्रामीण - १८

पुणे मनपा आणि ठाणे मनपा - १२

नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण डोंबिवली प्रत्येकी - ७

नागपूर आणि सातारा प्रत्येकी - ६

उस्मानाबाद - ५

वसई विरार आणि नादेंड प्रत्येकी - ३

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी - २

लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर, कोल्हापूर प्रत्येकी - १

COVID19 : काळजी घ्या! भारतात वेगाने रुग्णवाढ; आज तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून
COVID19 : काळजी घ्या! भारतात वेगाने रुग्णवाढ; आज तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद
विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता, जाणून त्याच्याविषयी...

Omicron चा देशातील पहिला मृत्यू

देशात कोरोनाच्या ओमिक्रॉनबाधित रुग्णाचा पहिला मृत्यू पुण्यात नोंदवला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ५२ वर्षीय कोविड रुग्णाचा २८ डिसेंबरला हृदयविकाराने मृत्यू झाला होता. गुरुवारी त्याचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला. त्याने नायजेरियाचा प्रवास केला होता. त्याला १३ वर्षांपासून मधुमेह होता. त्याचा मृत्यू करोनासह इतर नॉन कोविड कारणांनी झाल्याची माहिती साथरोग विभागाने दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com