कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड लवकरच बाजारात उपलब्ध होणार?

कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड लवकरच बाजारात उपलब्ध होणार?

दिल्ली | Delhi

देशातील करोना लसीकरण मोहिमेला (corona vaccination campaign) एक वर्ष पूर्ण (one-year anniversary) झालं आहे. आतापर्यंत देशातील १५८ कोटींहून अधिक लोकांना करोना लसीचा (corona vaccine) डोस मिळाला आहे.

देशातील करोनाची लढाई लढण्याकरीता कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींचा मोठा वाटा आहे. आता या दोन्ही लस खुल्या बाजारात विक्रीस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड लवकरच बाजारात उपलब्ध होणार?
PHOTO : अल्लू अर्जुनची रियल लाईफ 'श्रीवल्ली' पाहिलीत का?

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याकरीता केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO) यांच्या एक्स्पर्ट पॅनेलने केन्द्र सरकारकडे शिफारस केली आहे. हि शिफारस मान्य झाली तर या दोन्ही लस विक्रीसाठी लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.

कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड लवकरच बाजारात उपलब्ध होणार?
Dhanush and Aishwaryaa : धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट, का घेतला निर्णय?

सीरम इन्स्टिट्यूटनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कोविशील्ड लसीच्या मार्केटिंगसाठीच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. तर भारत बायोटेकनंही कोव्हॅक्सीनच्या मार्केटिंगसाठी नुकताच अर्ज दाखल केला आहे.

कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड लवकरच बाजारात उपलब्ध होणार?
सोशल मीडियावर 'प्रियांका चोप्रा'च्या भन्नाट लुकची चर्चा, पाहा PHOTOS

'कोविशील्ड लसीच्या संपूर्ण मार्केटिंग ऑथोराजयझेशनचा विचार करण्यासाठी सरकारकडे आता आवश्यक अशी सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे', असं ट्विट देखील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी केलं होतं.

औषध महानियंत्रकांच्या परवानगीनंतर या दोन लशी मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. अर्थात या लशींची खुलेआम विक्री करता येणार नाही. तर कोविन पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयं आणि क्लिनिकशी संबंधित मेडिकल स्टोअर्समध्येच या लशी उपलब्ध केल्या जातील. याशिवाय केवळ पात्र नागरिकच ही लस विकत घेऊ शकणार आहेत.

कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड लवकरच बाजारात उपलब्ध होणार?
Sonalee Kulkarni : अप्सरेचा अनोखा अंदाज, चाहत्यांना लावले वेड
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com