Crona Update : भारतात गेल्या २४ तासात २७ हजार नवे करोनाबाधित; Omicron चे दीड हजारच्या पुढे

Crona Update : भारतात गेल्या २४ तासात २७ हजार नवे करोनाबाधित; Omicron चे दीड हजारच्या पुढे

दिल्ली | Delhi

दोन वर्षांपासून देशावर करोनाचे (covid19) संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचे (corona update india) रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे करोनाचे संकट टळले असे वटत होते. मात्र पुन्हा एकदा देशात करोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. करोनाबरोबर ओमिक्रॉनच्या रुगणसंख्येत (Omicron variant) देखील वाढ होत आहे.

Crona Update : भारतात गेल्या २४ तासात २७ हजार नवे करोनाबाधित; Omicron चे दीड हजारच्या पुढे
करोनाचा नवा व्हेरियंट 'ओमिक्रॉन'ची लक्षणे काय?, कशी घ्याल काळजी?

देशात गेल्या २४ तासात तब्बल २७ हजार ५५३ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात २८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ३ कोटी ४२ लाख ८४ हजार ५६१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ४ लाख ८१ हजार ७७० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १ लाख २२ हजार ८०१ जण करोनावर उपचार घेत आहेत.

दरम्यान, गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात ९ हजार १७० आढळले आहेत. तर त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल ४ हजार ५१२, दिल्ली २ हजार ७१६, केरळ २ हजार ४३५, तामिळनाडू १ हजार ४८९ असे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ७३.७६ टक्के रुग्ण पाच राज्यांत आढळून आले असून, त्यापैकी ३३.२८ टक्के महाराष्ट्रा आढळले आहेत.

Crona Update : भारतात गेल्या २४ तासात २७ हजार नवे करोनाबाधित; Omicron चे दीड हजारच्या पुढे
ओमिक्रॉन व्हेरिएंटवर Covishield प्रभावी आहे का? अदर पूनावाला म्हणाले....

वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या १ हजार ५२५ इतकी झाली आहे. यात सर्वाधिक महाराष्ट्रात (Maharashtra) ४६० रुग्णांची नोंद आहे. तर त्याखालोखाल दिल्लीत (Delhi) ३५१ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले. गुजरात, तामिळनाडु, केरळमध्ये ओमिक्रॉनचे प्रत्येकी १०० हून अधिक रुग्ण आहेत. देशातील एकूण १ हजार ५२५ ओमिक्रॉन बाधितांपैकी ५६० जण बरे होऊन घरी परतले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com