
दिल्ली | Delhi
करोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेतून सावरत व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच देशात करोना संसर्ग पुन्हा चिंता वाढवत आहे. आज देशात १२ हजाराहून अधिक नोंद झाली आहे. (corona new cases)
गेल्या २४ तासात १२ हजार १३३ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ५८ हजार २१५ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासात ७ हजार ४२४ लोक करोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत देशात करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ४ कोटी ३२ लाख ४५ हजार ५१७ वर पोहोचली आहे, तर एकूण बरे झालेल्यांची संख्या ४ कोटी २६ लाख ६७ हजार ०८८ आहे. करोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या ५ लाख २४ हजार ७९२ वर पोहोचली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात ४ होकार ०२४ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ३ हजार ०२८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर २ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १९ हजार २६१ इतकी आहे.