COVID19 : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट, पण...

COVID19 : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट, पण...

दिल्ली l Delhi

संपूर्ण जगात करोनाचा (COVID19) शिरकाव झाल्यापासून करोनाने भारतातही कहर माजवला होता. जगात सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या काही देशात भारताचा समावेश होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गेल्या २४ तासात वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद ही केरळमध्ये झाली आहे. (Corona active patient)

भारतात गेल्या २४ तासांत ९ हजार २८३ रुग्णांची नोंद (Coronavirus news patient) करण्यात आली आहे. तर ४३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या देशात १ लाख ११ हजार ४८१ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच देशात गेल्या २४ तासांत १० हजार ९४९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ४ लाख ६६ हजार ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला (COVID19 death) आहे. तर आतापर्यंत ३ कोटी ४५ लाख ३५ हजार ७३६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

भारतात करोना रुग्णांची संख्या कमी होतेय तर दुसरीकडे केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं टेन्शन वाढलं आहे. केरळमध्ये मंगळवारी ४ हजार ९७२ रुग्ण समोर आले आहेत. तर, ३७० जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये आतापर्तंय ५० लाख ९७ हजार ८४५ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. (Corona update Keral)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com