करोनाचं पुन्हा थैमान! गेल्या २४ तासांत ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद; Omicronचे २ हजारांच्या पुढे

करोनाचं पुन्हा थैमान! गेल्या २४ तासांत ५० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद; Omicronचे २ हजारांच्या पुढे

दिल्ली | Delhi

दोन वर्षांपासून देशावर करोनाचे (covid19) संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचे (corona update india) रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे करोनाचे संकट टळले असे वटत होते. मात्र पुन्हा एकदा देशात करोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. करोनाबरोबर ओमिक्रॉनच्या रुगणसंख्येत (Omicron variant) देखील वाढ होत आहे.

देशात गेल्या २४ तासात तब्बल ५८ हजार ०९७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात ५३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५ हजार ३८९ जण करोनामुक्त होऊन घरी परतले असून आतापर्यंत ३ कोटी ४३ लाख २१ हजार ८०२ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ४ लाख ८२ हजार ५५१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात २ लाख १४ हजार ४ जण करोनावर उपचार घेत आहेत.

तसेच देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २ हजार १३५ झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीतून सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ६५३ आणि दिल्लीत ४६४ रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनवरील २ हजार १३५ रुग्णांपैकी ८२८ बरे झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com