COVID19 : भारतात करोनाच्या नव्या रुग्णसंख्येत किंचित घट; महाराष्ट्राची स्थिती काय?

COVID19 : भारतात करोनाच्या नव्या रुग्णसंख्येत किंचित घट; महाराष्ट्राची स्थिती काय?
Corona

दिल्ली | Delhi

दोन वर्षांपासून देशावर करोनाचे (covid19) संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचे (corona update india) रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे करोनाचे संकट टळले असे वटत होते.

मात्र पुन्हा एकदा भारतात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं चिंता वाढली आहे. तर, ओमायक्रॉन (omicron) प्रकाराचे रुग्णही मोठ्या संख्येनं आढळत आहेत.

Corona
...तरच करा करोना चाचणी; ICMR ने जारी केली नवी नियमावली

मात्र देशात आज करोना रुग्णांच्या संख्येत सोमवारच्या तुलनेत घट झाली आहे. काल (सोमवार) १ लाख ७९ हजार ७२३ करोना रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात १ लाख ६८ हजार ६३ नवीन रुग्ण (new corona patient) सापडले आहेत. तर २७७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

पण आज दैनंदिन रुग्ण संख्येत घट झाली असली तरी सक्रिय रुग्णांची (covid19 active patient) संख्या ८ लाख २१ हजार ४४६ इतकी झाली आहे. देशातील डेली पॉझिटिव्हीटी रेट (Daily positivity rate) १०.४६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

Corona
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

महाराष्ट्राची स्थिती काय?

महाराष्ट्रात काल (सोमवार) करोनाच्या ३३ हजार ४७० नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर २९ हजार ६७१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण ६६ लाख ०२ हजार १०३ नवे रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९५ टक्के इतके झाले आहे. तसेच काल राज्यात ८ मृत्यूंची नोंद झाली असून राज्यातील मृत्यूदर २.३ टक्के इतका झाला आहे.

Corona
PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com