COVID19 : देशात करोनानं पुन्हा वेग पकडला, सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख २३ हजारांवर

COVID19 : देशात करोनानं पुन्हा वेग पकडला, सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख २३ हजारांवर

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. देशात गेल्या २४ तासांत १६ हजार ५६१ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे.

राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये करोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण ०.२८ टक्के आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५३ टक्के आहे.

देशात गुरुवारी दिवसभरात १८ हजार ५३ रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण ४ कोटी ३५ लाख ७३ हजार ९४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख २३ हजार ५३५ इतकी आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com