Corona Update : करोनाचा धोका अद्यापही कायम, जाणून घ्या ताजी आकडेवारी

Corona Update : करोनाचा धोका अद्यापही कायम, जाणून घ्या ताजी आकडेवारी

दिल्ली | Delhi

करोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेतून सावरत व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच देशात नव्या करोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार सुरूच आहे.

गेल्या २४ तासात २० हजार ४०९ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ३२ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून १ लाख ४३ हजाराच्या पुढे पोहचली आहे.

दरम्यान जगातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्स व्हायरसने (Monkeypox) आता भारतातही पाऊल ठेवलं आहे.

देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे जवळपास ७ रुग्ण सापडले आहेत. यापैकी ३ रुग्ण केरळमध्ये तर १ दिल्लीत सापडला आहे. याशिवाय उत्तरप्रदेशात ३ रुग्ण सापडले असल्याची माहिती आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com