
दिल्ली | Delhi
करोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेतून सावरत व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच देशात करोना संसर्ग पुन्हा चिंता वाढवत आहे. आज देशात १८ हजाराहून अधिक नोंद झाली आहे. (corona new cases)
गेल्या २४ तासात १८ हजार ८१९ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ३२ हजार ४९० वर पोहोचली आहे. तर ३९ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
तसेच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ५५५ इतकी झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत १३ हजार ८२७ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.