
दिल्ली | Delhi
देशात करोना (corona update) प्रकरणांमध्ये घट झाल्याच्या काही आठवड्यांनंतर आता पुन्हा एकदा करोनाने (covid19) डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे.
गेल्या २४ तासात २ हजार ८२८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या ५ लाख २४ हजार ५८६ इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रीय करोना रुग्णांची संख्या १७ हजार ०८७ इतकी झाली आहे.
दरम्यान काल देशात २ हजार ०३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ४ कोटी २६ लाख ११ हजार ३७० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन करोना संसर्गाचा दर ०.६० टक्के इतका आहे. तसेच सध्याचा रिकव्हरी रेट ९८.७४ टक्के आहे.