COVID19 : भारतात वेगाने वाढताय नवे करोना रुग्ण; तज्ज्ञांचा 'तो' इशारा खरा ठरणार?

COVID19 : भारतात वेगाने वाढताय नवे करोना रुग्ण; तज्ज्ञांचा 'तो' इशारा खरा ठरणार?

दिल्ली | Delhi

दोन वर्षांपासून देशावर करोनाचे (covid19) संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचे (corona update india) रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे करोनाचे संकट टळले असे वटत होते. मात्र पुन्हा एकदा भारतात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं चिंता वाढली आहे. तर, ओमायक्रॉन (omicron) प्रकाराचे रुग्णही मोठ्या संख्येनं आढळत आहेत.

COVID19 : भारतात वेगाने वाढताय नवे करोना रुग्ण; तज्ज्ञांचा 'तो' इशारा खरा ठरणार?
Happy Birthday Hima Das : वाचा, 'हिमा दास'च्या जिद्दीची कहाणी!

देशात गेल्या २४ तासात तब्बल १ लाख ५९ हजार ६३२ नवे रुग्ण (Corona Positive) सापडले आहेत. तर दिवसभरात ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४० हजार ८६३ जण करोनामुक्त होऊन घरी परतले असून आतापर्यंत ३ कोटी ४४ लाख ५३ हजार ६०३ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ४ लाख ८३ हजार ७९० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ५ लाख ९० हजार ६११ जण करोनावर उपचार घेत आहेत.

भारतात दररोज १४ लाख नवे रुग्ण आढळणार?

आतापर्यंत, भारतात ३ हजाराहून अधिक ओमिक्रॉन प्रकरणं (Omicron Cases in India) नोंदवली गेली आहेत. काही दिवसांपूर्वी NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनीही इशारा दिला होता की, ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन विषाणूमुळं कोविडच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ते म्हणाले की, जर भारतात लोकसंख्येच्या पातळीवर याचं संक्रमण होत असेल तर, याचा अर्थ भारतात दररोज १४ लाख नवे रुग्ण नोंदवले जाऊ शकतात.

COVID19 : भारतात वेगाने वाढताय नवे करोना रुग्ण; तज्ज्ञांचा 'तो' इशारा खरा ठरणार?
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

ओमिक्रॉनची स्थिती काय?

करोना रुग्णांची संख्या वाढत असताना ओमिक्रॉन बाधितांचा आकडाही चिंता वाढवणारा आहे. भारतातील २७ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या ३ हजार ६२३ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार ४०९ जण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद असून तो आकडा १ हजाराच्या वर पोहोचला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीत पाचशेपेक्षा जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण नोंद झाले आहेत.

COVID19 : भारतात वेगाने वाढताय नवे करोना रुग्ण; तज्ज्ञांचा 'तो' इशारा खरा ठरणार?
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

आतापर्यंत १५१ कोटींहून अधिक डोस देण्यात आले

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५१ कोटींहून अधिक अँटी-करोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. शनिवारी ८९ लाख २८ हजार ३१६ डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत १५१ कोटी ५७ लाख ६० हजार ६४५ डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.

COVID19 : भारतात वेगाने वाढताय नवे करोना रुग्ण; तज्ज्ञांचा 'तो' इशारा खरा ठरणार?
'या' ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com