COVID19 : देशात करोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज खरा ठरणार?

गेल्या २४ तासात रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ
COVID19 : देशात करोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज खरा ठरणार?

दिल्ली | Delhi

करोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेतून सावरत व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच देशात करोना संसर्ग पुन्हा चिंता वाढवत आहे. आज देशात ७ हजाराहून अधिक नोंद झाली आहे. (corona new cases)

गेल्या २४ तासात ७ हजार २४० नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ३२ हजार ४९० वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ४० टक्क्यांनी वाढत आहे.

तसेच गेल्या २४ तासात कालावधीत ३ हजार ५९१ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, यादरम्यान ८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात करोनाच्या चौथ्या लाटेचा तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरणार की, काय? अशी भिती व्यक्त होत आहे.

आतापर्यंत देशात एकूण ४ कोटी ३१ लाख ९७ हजार ५२२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ४ कोटी २६ लाख ४० हजार ३०१ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, देशात करोनामुळे आतापर्यंत ५ लाख २४ हजार ७२३ जणांना जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या २४ तासात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी २ हजार ७०१ रुग्ण केवळ महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. ही गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी वाढ आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्येतही ४२ टक्क्यांनी वाढ झालीय. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com