
दिल्ली | Delhi
करोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेतून सावरत व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच देशात करोना संसर्ग पुन्हा चिंता वाढवत आहे. आज देशात ४ हजाराहून अधिक नोंद झाली आहे. (corona new cases)
गेल्या २४ तासात ४ हजार ५१८ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या ५ लाख २४ हजार ७०१ इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रीय करोना रुग्णांची संख्या २५ हजार ७८२ इतकी झाली आहे. (Corona update) दरम्यान काल देशात २ हजार ७७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ४ कोटी २६ लाख ३० हजार ८५२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रातील स्थिती काय?
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १ हजार ४९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ६१४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ३८ हजार ५६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०४% एवढे झाले आहे.