देशात करोनाचा आलेख पुन्हा चढता; गेल्या २४ तासात...
Corona

देशात करोनाचा आलेख पुन्हा चढता; गेल्या २४ तासात...

दिल्ली । Delhi

काही महिन्यांपासून आटोक्यात आलेला करोनानं (Coronavirus) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. देशात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये देशात नव्या ४ हजार २७० रुग्णांची नोंद झाली असून २ हजार ६१९ रुग्ण बरं होऊन घरे परतले. तसेच गेल्या चोवीस तासांमध्ये १५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशभरात उपचाराधीन रुग्णांची संख्या २४ हजार ०५२ इतकी झाली आहे.

दरम्यान देशात करोना रुग्णांच्या बाबतीत अव्वल ठरलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा संसर्गाचा वेग वाढला आहे. महाराष्ट्रात शनिवारी १ हजार ३५७ नवीन रुग्ण आढळले तर ५९५ बरे झाले आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला. आता महाराष्ट्रात उपचाराधीन रुग्णांची संख्या ५ हजार ८८८ इतकी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com