काळजी घ्या! ७ महिन्यांनंतर देशातला रुग्णांचा आकडा १ लाखांवर, omicron रुग्णांची संख्या ३ हजारांवर

काळजी घ्या! ७ महिन्यांनंतर देशातला रुग्णांचा आकडा १ लाखांवर, omicron रुग्णांची संख्या ३ हजारांवर

दिल्ली | Delhi

दोन वर्षांपासून देशावर करोनाचे (covid19) संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचे (corona update india) रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे करोनाचे संकट टळले असे वटत होते. मात्र पुन्हा एकदा भारतात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं चिंता वाढली आहे. तर, ओमायक्रॉन (omicron) प्रकाराचे रुग्णही मोठ्या संख्येनं आढळत आहेत.

देशात गेल्या २४ तासात तब्बल १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात ३०२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३० हजार ८३६ जण करोनामुक्त होऊन घरी परतले असून आतापर्यंत ३ कोटी ४३ लाख ७१ हजार ८४५ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ४ लाख ८३ हजार १७८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ३ लाख ७१ हजार ३६३ जण करोनावर उपचार घेत आहेत.

देशात आतापर्यंत ओमिक्रॉन ची ३ हजार ७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र, यातील ११९९ लोक बरेही झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ८७६, दिल्लीत ४६५, कर्नाटकात ३३३, राजस्थानमध्ये २९१, केरळमध्ये २८४, गुजरातमध्ये २०४ प्रकरणे आहेत. त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये १२१, हरियाणामध्ये ११४, तेलंगणात १०७, ओडिशात ६०, उत्तर प्रदेशात ३१, आंध्र प्रदेशात २८, बंगालमध्ये २७, गोव्यात १९, आसाममध्ये ९, मध्य प्रदेशात ९, उत्तराखंड ८ रुग्ण आढळून आलेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com