
दिल्ली | Delhi
गेल्या अनेक दिवसांपासून देशात करोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांसह मृतांचाही आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या (Covid-19) रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. करोना रुग्णांचा वेग हा झपाट्याने वाढत (Covid petients Increasing) असल्याने करोना रुग्णांची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत देशातील करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा १० हजार पार गेली आहे. तर सक्रीय करोना रुग्णांची संख्या ६७ हजार पार झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशामध्ये गेल्या २४तासांत कोरोनाची लागण झालेले १० हजार ११२ नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार ८०६ वर पोहोचली आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Corona Patient) लक्षात घेता सरकारसोबतच सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
करोना रिकव्हरी रेट ९८.६६ टक्के आहे. करोनापासून बरे झालेल्या लोकांची संख्या ४ कोटी ४२ लाख ८३ हजार ०२१ वर पोहोचली आहे, तर डेट रेट १.१८ टक्के झाला आहे. तर देशभरातील जनतेला कोरोनावरील लसीचे २२०.६६ कोटी डोस देण्यात आले आहेत.