करोनाची तिसरी लाट : रोज ४ लाख रुग्ण सापडणार, निती आयोगाने दिल्या 'या' सूचना

करोनाची तिसरी लाट : रोज ४ लाख रुग्ण सापडणार, निती आयोगाने दिल्या 'या' सूचना

दिल्ली | Delhi

मागील जवळपास पावणे दोन वर्षांपासून करोनानं (Coronavirus) संपूर्ण जगाला तांडव घातला आहे. करोनाच्या पहिल्या (Corona first wave) आणि दुसऱ्या लाटेनं (Corona second wave) देशाचं आर्थिक कंबरडं मोडलं आहे. तर लाखो लोकांचा जीवही घेतला आहे.

अशात सप्टेंबर महिन्यात करोनाची तिसरी लाट (Corona Virus 3rd Wave Alert) येऊ शकते, असा इशारा यापूर्वी देण्यात आला आहे. याबद्दल नीती आयोगाचे (NITI Aayog) सदस्य व्ही. के. पॉल (VK Paul) यांनी गेल्याच महिन्यात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही शिफारशी केल्या आहेत. त्यांनी महत्त्वाची आकडेवारीदेखील सरकारला दिली आहे.

नीती आयोगानं (NITI Aayog) सरकारला तिसऱ्या लाटेबद्दलचा (Third Wave of Corona in India) अहवाल सरकारला दिला आहे. या अहवालाच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. देशाला भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावं लागेल, असा धोक्याचा इशारा नीती आयोगानं दिला आहे. तिसरी लाट टोक गाठेल त्यावेळी देशात दररोज ४ ते ५ लाख रुग्ण आढळून येतील. त्यामुळे दोन लाख आयसीयू बेड (ICU bed) तयार ठेवावे लागतील. देशाला ५ लाख ऑक्सिजन बेड (Oxygen Bed) आणि १० लाख आयसोलेशन केअर बेडची गरज लागेल, असा अंदाज नीती आयोगानं वर्तवला आहे.

दरम्यान सप्टेंबर २०२० मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेचा अंदाज काही महिन्यापूर्वी वर्तवण्यात आला होता. तेव्हा १०० पैकी २० करोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा अंदाज बांधण्यात आला होता. त्यापैकी तीन जणांना आयसीयूत भरती करावं लागेल. तसेच लक्षणं नसलेल्या ५० जणांना सात दिवसांसाठी विलगीकरण केंद्रात ठेवावं लागेल. तसेच उर्वरित करोना रुग्णांना घरी ठेवावं लागेल, अशा सूचना दिल्या होत्या. हा सर्व अंदाज करोनाच्या पहिल्या लाटेनंतर कोविड रुग्णालयं आणि बेडच्या वापरावर आधारित होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com