देशात लसीकरणाचा 25 कोटींचा टप्पा पार

देशात लसीकरणाचा 25 कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली - देशातील करोना लसीकरणाने 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 25 कोटींहून अधिक करोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

शनिवारी देशाच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा 148 वा दिवस होता. शनिवारी दिवसभरात 31 लाख 67 हजार लाभार्थ्यांनी लस घेतली असल्याचे आरोग्य मंत्रालयान सांगितले आहे.

यापैकी 28 लाख 11 हजार लाभार्थ्यांनी लसीची पहिली मात्रा, तर 3 लाख 56 हजार लाभार्थ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत देशात आतापर्यंत लसीच्या 25 कोटी 28 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com