Child Vaccination : आजपासून मुलांच्या लसीकरणाची नोंदणी; कशी कराल नोंदणी? कोणती लस देणार?

Child Vaccination : आजपासून मुलांच्या लसीकरणाची नोंदणी; कशी कराल नोंदणी? कोणती लस देणार?

दिल्ली | Delhi

३ जानेवारी देशात १५ वर्षांवरील मुलांचं लसीकरण (COVID-19 Vaccination For Children) सुरु होणार आहे आणि त्यासाठी आजपासून नोंदणी करता येणार आहे. १५ ते १८ वर्षांच्या मुलांना लस (CoWIN Registration Begins For 15-18 Age Group) देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्याची तयारी प्रशासनानं पूर्ण केली आहे.

Child Vaccination : आजपासून मुलांच्या लसीकरणाची नोंदणी; कशी कराल नोंदणी? कोणती लस देणार?
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

नोंदणी करण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे दहावीचे शाळेचे ओळखपत्र देखील ग्राह्य धरले जाणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केली आहेत. देशात वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका यामुळे लसीकरण महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळ न दवडता लहान मुलांचंही लसीकरण करून घ्यावं.

Child Vaccination : आजपासून मुलांच्या लसीकरणाची नोंदणी; कशी कराल नोंदणी? कोणती लस देणार?
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

कशी कराल नोंदणी?

- सर्वात आधी आपल्याला आरोग्य सेतु अ‍ॅप किंवा Cowin.gov.in या वेबसाइट जावे लागणार आहे.

- जर तुमचे CoWIN वर रजिस्टेशन नाहीत तर, रजिस्टर हा पर्याय निवडावे.

- त्यानंतर आता तुमच्या समोर एक रजिस्ट्रेशन पेज आले असेल. त्यावर फोटो, आयडी टाईप, आपले संपुर्ण नाव हे टाका. ( येथे आपण इयत्ता दहावीचा आयडी कार्ड देखील सिलेक्ट करू शकता) सोबतच मुलाचे वय आणि लिंग स्त्री/ पुरुष टाका.

- त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस प्राप्त होईल.

-त्यानंतर तुम्हाला आपल्या एरियाचा पिन कोड टाकावा लागेल, पिन कोड टाकल्यानंतर लगेचच तुमच्यासमोर करोना लसीकरण सेंटरची यादी येईल. त्यात तुम्हाला जो योग्य वाटेल त्याची निवड करा.

- तारीख, वेळ टाकल्यानंतर नियोजीत दिवशी जाऊन करोना प्रतिबंधक लस घ्या.

- लसीकरण केंद्रावर आपल्याला आयडी कार्ड आणि सिक्रेट कोडची माहिती द्यावी लागणार आहे. जो की तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर देण्यात येईल.

Child Vaccination : आजपासून मुलांच्या लसीकरणाची नोंदणी; कशी कराल नोंदणी? कोणती लस देणार?
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?

जर आपण पुर्वीपासून CoWIN अ‍ॅप वापरत असाल...

- जर आपण पुर्वीपासून CoWIN अ‍ॅप वापरत असाल, तर साइन इन हा पर्याय निवडावे. त्यानंतर आपला रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक टाका आणि गेट OTP हा पर्याय निवडा.

- त्यानंतर आलेला OTP टाकून, व्हेरिफाई करुन घ्या.

- आता आपल्या परिसराचा पिन कोड टाका. त्यानंतर आपल्यासमोर लसीकरण सेंटरची यादी आली असेल. त्यावर वेळ, दिनांक टाका.

- एक मोबाईल क्रमांकाद्वारे सुमारे चार जणांचे रजिस्टेशन होऊ शकते. कृपया याची नोंद घ्यावी.

Child Vaccination : आजपासून मुलांच्या लसीकरणाची नोंदणी; कशी कराल नोंदणी? कोणती लस देणार?
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

कोणती लस देणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संबोधनात लशीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. DCGI ने लहान मुलांसाठी Covaxin लस मंजूर केली आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणाही झाली आहे. लस 15 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांला आपत्कालीन परिस्थितीत देण्यात येणार आहे. मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारकडून भारत बायोटेकला ऑर्डर देण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com