दिल्ली | Delhi

देशात पुन्हा एकदा करोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस आकडेवारीत वाढ होत असून, गेल्या २४ तासांत देशात ३७ हजारांहून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

गेल्या २४ तासांमध्ये देशात ३७ हजार ९७५ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय ४८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या आता ९१ लाख ७७ हजार ८४१ वर पोहचली आहे. सद्यस्थितीस देशात ४ लाख ३८ हजार ६६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८६ लाख ०४ हजार ९५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. याशिवाय देशभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ३४ हजार २१८ झाली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती ?

राज्यात मागील २४ तासात ४ हजार १५३ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १७ लाख ८४ हजार ३६१ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ३ हजार ७२९ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १६ लाख ५४ हजार ७९३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.