दिल्ली । Delhi

देशातील करोना संसर्ग अद्यापही वाढतच आहे. देशातील एकूण रूग्णसंख्या १ कोटीच्यावर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

मागील २४ तासांत देशभरात २५ हजार १५३ नवे करोनाबाधित आढळले असून, सध्या देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ४ हजार ५९९ वर पोहचलेली आहे. तसेच, सद्यस्थितीस देशात ३ लाख ८ हजार ७५१ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत ९५ लाख ५० हजार ७१२ जण करोनामुक्त झाले असल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे.

दरम्यान, भारताचा करोना रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हा जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे भारतापेक्षा कमी आहे.

देशात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे जवळपास ५२ टक्के इतके आहे. दररोज करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येतही घट झाली असून गेले १३ दिवस बळींची संख्या ५०० हून कमी आहे.

याशिवाय, देशात कोविड १९ प्रतिबंधक लस घेणे नागरिकांसाठी ऐच्छिक राहील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारतात विकसित करण्यात आलेल्या लशी इतर देशांतील लशीइतक्याच परिणामकारक आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र सरकार लसीकरण मोहिमेची (Vaccination Drive) तयारी करत असताना ५० % हून अधिक भारतीय कोविड-19 ची लस (Covid-19 Vaccine) घेण्याबाबत चिंता दर्शवली आहे, असे एका सर्वेक्षणातून समोर आले. कोविड-19 मुळे संपूर्ण जग त्रासून गेले होते. परंतु, नुकतीच लसींना मंजूरी मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सर्व नागरिकांना लवकरात लवकर लस दिली जावी यासाठी लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु आहे. कमी काळात आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्पादनामुळे लसीच्या क्षमतेवर आणि सुरक्षिततेवर काही प्रश्न उभे राहत आहेत.