Covid-19 : देशातील रुग्णसंख्या काहीशी घटतेय

देशात आतापर्यंत एकूण ६६ लाखांहून अधिक लोकांना करोनाची लागण
करोना अपडेट
करोना अपडेट

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात ६१ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

गेल्या २४ तासात ८८४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ६१ हजार २६७ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ६६ लाख ८५ हजार ०८३ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ५६ लाख ६२ हजार ४९१ रूग्ण करोनामुक्त झाले असून ९ लाख १९ हजार ०२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख ०३ हजार ५६९ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात करोनाचे 10,244 रुग्ण आढळले

महाराष्ट्रात करोनाचे आणखी १० हजार २४४ रुग्ण आढळले असून २६३ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधितांचा आकडा १४ लाख ५३ हजार ६५३ वर पोहचला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com