दिल्ली | Delhi

देशात करोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आता देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ९५ लाखांच्या पुढे गेली आहे.

मागील २४ तासांमध्ये ३५ हजार ५५१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याने, देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९५ लाख ३४ हजार ९६५ झाली आहे. तर, याच कालावधीत ५२६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशभरातील एकूण संख्या आता १ लाख ३८ हजार ६४८ झाली आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४ लाख २२ हजार ९४३ वर आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

राज्यात काल दिवसभरात ५ हजार ६०० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. तर १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ५ हजार ०२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील एकूण रुग्णसंख्या १८ लाख ३२ हजार १७६ एवढी झाली आहे. तर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १६ लाख ९५ हजार २०८वर पोहोचली आहे. तर कालपर्यंत ४७ हजार ३५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.