दिल्ली | Delhi

मागील दोन दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ९७ लाखांचा आकडा ओलांडला आहे तर

करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ९२ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

मागील २४ तासांमध्ये ३१ हजार ५२२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याने, देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९७ लाख ६७ हजार ३७२ झाली आहे. तर, याच कालावधीत ४१२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशभरातील एकूण संख्या आता १ लाख ४१ हजार ७७२ झाली आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ३ लाख ७२ हजार २९३ इतकी आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत ३७ हजार ७२५ रुग्ण करोना मुक्त झाले असून आजपर्यंत ९२ लाख ५३ हजार ३०६ रुग्ण करोना मुक्त झाले आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

राज्यात मागील २४ तासात ४ हजार ९८१ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १८ लाख ५४ हजार ३४८ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ५ हजार १११ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १७ लाख ४२ हजार १३१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ७४ हजार ३१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४७ हजार ९०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.