करोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत संपणार, तिसरी लाट ‘या’ महिन्यात

करोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत संपणार, तिसरी लाट ‘या’ महिन्यात

केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेल्या समितीचा अंदाज

नवी दिल्ली - करोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत संपेल आणि पुढील सहा ते आठ महिन्यांत करोनाची तिसरी लाट येईल असा अंदाज केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन-सदस्यांच्या समितीने व्यक्त केला आहे.

सूत्र (SUTRA – Susceptible, Undetected, Tested (positive), Removed Approach) या मॉडेलचा वापर करुन वैज्ञानिकांनी असा अंदाज वर्तविला आहे की, दिवसाला अंदाजे दीड लाख नवे करोना रुग्ण मेच्या अखेरीस आढळतील आणि जूनच्या शेवटी 20 हजार रूग्णांची नोंद होईल. यासह जुलैपर्यंत करोनाची दुसरी लाट संपेल तेसच येत्या 6-8 महिन्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, समितीने तिसर्‍या लाटेत कोणत्या राज्यात रुग्णसंख्या कमी होऊ शकते आणि कोणत्या राज्यांना फटका बसू शकतो याचाही अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाण, दिल्ली आणि गोवा या राज्यांनी आधीच शिखर गाठलं आहे, असं समितीचे सदस्य असणारे आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं आहे. मॉडेलनुसार, तामिळनाडूत 29 मे 31 मे दरम्यान आणि पुद्दुचेरीत 19 ते 20 मे दरम्यान रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांत अद्याप करोनाची स्थिती साधारण आहे. आसाममध्ये 20-21 मे, मेघालयमध्ये 30 मे आणि त्रिपुरामध्ये 26-27 मे रोजी रुग्णसंख्येचं शिखर गाठलं जाऊ शकतं. दरम्यान उत्तरेकडे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सध्या रुग्णवाढ दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 24 मे आणि पंजाबमध्ये 22 मे रोजी मोठी रुग्णवाढ पहायला मिळू शकते असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मॉडेलनुसार, करोनाची तिसरी लाट सहा ते आठ महिन्यांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणामही उशिरा जाणवू शकतो. लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढली असेल त्यामुळे अनेकजण तिसर्‍या लाटेपासून सुरक्षित असतील, अशी मााहिती अग्रवाल यांनी दिली आहे. ऑक्टोबर 2021 पर्यंत करोनाची तिसरी लाट येणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com