करोनाचा कहर सुरूच ; देशात 24 तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण

रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 47 लाखांवर
करोनाचा कहर सुरूच ;  देशात 24 तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण

नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक करोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 2 लाख 61 हजार 500 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

तर 1,501 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे.

करोनामुळे देशात तब्बल 1 लाख 77 हजार 150 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज रविवारी (18 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,47,88,109 पोहोचली असून करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 77 हजारांवर पोहोचला आहे. देशातील करोनाग्रस्तांपैकी 18,01,316 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,28,09,643 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com