दिल्ली | Delhi

देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ९६ लाखांचा आकडा ओलांडला आहे तर करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९४.११ टक्क्यांवर पोहोचले आहे, दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ३६ हजारांच्या वर नवे रुग्ण आढळून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

मागील २४ तासांमध्ये ३६ हजार ६५२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याने, देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९६ लाख ०८ हजार २११ झाली आहे. तर, याच कालावधीत ५१२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशभरातील एकूण संख्या आता १ लाख ३९ हजार ७०० झाली आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४ लाख ०९ हजार ६८९ इतकी आहे.

दरम्यान, देशात मागील २४ तासांत ११ लाख ५७ हजार ७६३ करोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण १४ कोटी ५८ लाख ८५ हजार ५१२ करोना चाचण्या झाल्या आहेत अशी माहिती ICMR ने दिली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

राज्यात काल दिवसभरात ६ हजार ७७६ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १७ लाख १० हजार ५० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.८१ टक्के इतका झाला आहे. काल राज्यात ५ हजार २२९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात मागील २४ तासात १२७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कालपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ११ लाख ३२ हजार २३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ४२ हजार ५८७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४७ हजार ५०४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार ५६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८३ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. काल राज्यात ५ हजार २२९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ४२ हजार ५८७ इतकी झाली आहे.