COVID-19 : देशात ९ लाखांच्यावर रुग्णांवर उपचार सुरू

एकूण रुग्णसंख्या ६२ लाखांच्या पुढे
COVID-19 : देशात ९ लाखांच्यावर रुग्णांवर उपचार सुरू

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात ८० हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

गेल्या २४ तासात १ हजार १७९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ८० हजार ७७२ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ६२ लाख २५ हजार ७६४ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ५१ लाख ८७ हजार ८२६ रूग्ण करोनामुक्त झाले असून ९ लाख ४० हजार ४४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत ९७ हजार ४९७ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

देशात मोठ्या प्रमाणात करोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. मंगळवारी देशात एकूण १० लाख ८६ हजार ६८८ करोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात ७ कोटी ४१ लाख ९६ हजार ७२९ करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती ICMR कडून देण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com