दिल्ली | Delhi

युरोप आणि अमेरिकेत जरी करोनाची दुसरी लाट आली असली तरी, भारतात मात्र करोना वेग काही प्रमाणात मंदावलेला दिसतोय. करोनाने जगभरातील सुमारे १८० देशांमध्ये हाहाकार माजवला आहे. जगभरात आतापर्यंत सुमारे ७.८१ कोटी जणांना करोनाची लागण झाली असून, आतापर्यंत सुमारे १७.५६ लाखांपेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, भारतात मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ९८ लाखांचा आकडा ओलांडला आहे तर करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ९३ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये ३० हजार ००५ नव्या करोनाबाधितांची नोंद झाल्याने, देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ९८ लाख २६ हजार ७७५ झाली आहे. तर, याच कालावधीत ४४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशभरातील एकूण संख्या आता १ लाख ४२ हजार ६२८ झाली आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ३ लाख ५९ हजार ८१९ इतकी आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत ३३ हजार ४९४ रुग्ण करोना मुक्त झाले असून आजपर्यंत ९३ लाख २४ हजार ३२८ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.
.अमेरिकेत 'फायझर' लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी.
महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात काल २७७४ करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील एकूण १७ लाख ४९ हजार ९७३ रुग्णांनी आत्तापर्यंत करोनावर मात केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९३.४६ टक्के झाला आहे. काल राज्यात ४ हजार २६८ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर सध्या २.५७ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख ७० हजार १३७ नमुन्यांपैकी १८ लाख ७२ हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३२ हजार २८८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ५ हजार १२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७३ हजार ३१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल ४ हजार २६८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १८ लाख ७२ हजार ४४० इतकी झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.