दिल्ली l Delhi

देशात गेल्या २४ तासात २० हजारांहून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या आज पुन्हा एकदा वाढली असल्याचं दिसून आलं आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज रुग्णांच्या संख्या काहीशी वाढली आहे. मात्र अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या थोडीशी कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनासाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १ कोटी २ लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात २० हजार ०२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात २७९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात २ लाख ७७ हजार ३०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात एकूण १ कोटी ०२ लाख ०७ हजार ८७१ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १ लाख ४७ हजार ९०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात २१ हजार १३१ रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ९७ लाख ८२ हजार ६६९ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती

राज्यातील करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच असल्याचं दिसत आहे. करोनाबाधितांच्या संख्येसह करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. काल दिवसभरात ३ हजार ३१४ नवे करोनाबाधित आढळले असून, ६६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय, काल दिवसभरात २ हजार १२४ जणांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १९ लाख १९ हजार ५५० वर पोहचली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रिकव्हरी रेट ९४.२९ टक्के आहे. सध्या राज्यात ५९ हजार २१४ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १८ लाख ९ हजार ९४८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.

कालपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २५ लाख २ हजार ५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख १९ हजार ५५० (१५.३५ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ५७ हजार ३८५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार ३२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.