दररोज 1 हजारांहून अधिक रेल्वे कर्मचारी होताहेत करोना बाधित

दररोज 1 हजारांहून अधिक रेल्वे कर्मचारी होताहेत करोना बाधित
रेल्वे

नवी दिल्ली - देशात करोनाचे थैमान सुरुच असून भारतीय रेल्वेच्या कर्मचार्‍यांनाही मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग होत आहे. भारतीय रेल्वेमध्ये दररोज 1000 हून अधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. त्याचप्रमाणे आता पर्यंत 1 हजार 952 भारतीय रेल्वे कर्मचार्‍यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा म्हणाले, करोना काळात भारतीय रेल्वेची अवस्था सुद्धा देशातील इतर राज्यांप्रमाणेच आहे. भारतीय रेल्वेचे कर्मचारी करोनाचा सामना करत आहेत. आम्ही या काळात लोकांना हवी ती मदत करत आहोत. पण आमची परिस्थितीही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

भारतीय रेल्वे त्यांच्या कर्मचार्‍यांची पुरेपूर काळजी घेत आहेत. त्यांना आवश्यक असणार्‍या सर्व वैद्यकिय सुविधा पुरवत आहोत. 4 हजार रेल्वे कर्मचारी त्याचबरोबर कुटुंबीय रेल्वे रुग्णालयात उपचार घेत आहेत. रेल्वेच्या रुग्णालयात चादरींची संख्या वाढण्यात आली आहे त्याचबरोबर रुग्णालयात ऑक्सिजन देखिल बसवण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेचे सर्व कर्मचारी लवकर बरे होतील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com