नवी दिल्ली -

सरकारने नागरिकांसाठी स्वस्त उपचारांची व्यवस्था करावी, ‘राईट टू हेल्थ’ अंतर्गत स्वस्त दरात उपचार हा नागरिकांचा मुलभूत अधिकार

आहे असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (12 डिसेंबर) म्हटलं आहे.

करोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या नियमानुसार दर आकारातील अशी व्यवस्था सरकारने करावी असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना करोनाच्या गाईडलाईन्सचं पालन करण्याचा आदेश देत करोना रुग्णालयांमधील अग्नी सुरक्षेची काळजी घेण्याचेही आदेश दिले.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी करोना विषय गाईडलाईन्सचं कठोरपणे पालन करावं, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.