दिल्ली | Delhi

देशातील कोरोनाच्या आकड्यांमुळे गेल्या पाच दिवसांपासून दिलासा मिळत आहे. रोज कोरोनाचे सक्रीय रुग्ण कमी होत आहे. मागील तीन दिवसांपासून नवीन कोरोना रुग्ण ४० हजारापेक्षा कमी येत आहे. मंगळवारी ३६ हजार ६०४ रुग्ण झाले तर 43 हजार 203 रुग्ण बरे झाले.

,गेल्या २४ मध्ये देशभरात ३६ हजार ६०४ नवे करोनाबाधित आढळले असून, ५०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ९४ लाख ९९ हजार ४१४ वर पोहचली आहे. सध्या देशात ४ लाख २८ हजार ६४४ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, करोनामुळे आतापर्यंत १ लाख ३८ हजार १२२ रुग्ण दगावले आहेत. याशिवाय करोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज मिळालेल्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ४३ हजार ०६२ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे आतापर्यंत देशातील करोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळालेल्याची एकूण संख्या ८९ लाख ३२ हजार ६४७ वर पोहचली आहे.

याशिवाय करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपर्यंत देशभरात १४ कोटी २४ लाख ४५ हजार ९४९ नमुन्यांची तपासणी केली गेली आहे. यापैकी १० लाख ९६ हजार ६५१ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

राज्यात काल ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजार ४१२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.३९ % एवढे झाले आहे. राज्यात काल ४ हजार ९३० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात काल ९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५९% एवढा आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४७ हजार २४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण ९० हजार १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.