दिल्ली । Delhi

देशात करोनाबाधितांच्या संख्येत भर पडतच आहे व करोनामुळे मृत्यू देखील होत आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील रोज वाढत आहे.

मागील २४ तासांमध्ये देशभरात १८ हजार १७७ नवे करोनाबाधित आढळले व २१७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजार ९२३ जण करोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ३ लाख २३ हजार ९६५ वर पोहचली आहे. तर, सध्या देशात २ लाख ४७ हजार २२० अॅक्टिव्ह केसेस असून, ९९ लाख २७ हजार ३१० जण आतापर्यंत करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय करोनामुळे देशात आजपर्यंत १ लाख ४९ हजार ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

महाराष्ट्रात काल आज २ हजार ११० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८ लाख ३४ हजार ९३५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ % एवढे झाले आहे. आज राज्यात ३ हजार २१८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल ५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २८ लाख ९० लाख ४४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख ३८ हजार ८५४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ५८ हजार ६६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार १५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.